पोलादपूर शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू व ‘होम मिनिस्टर’ खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

पोलादपूर : संदीप जाबडे
पोलादपूर शहरात प्रथमच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील महिला वर्गासाठी हळदीकुंकू व ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील सर्व महिलांना पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू वाण देण्यात आले. त्यानंतर महिलांचा आवडीचा आणि मनोरंजनात्मक असणारा ‘होम मिनिस्टर’ खेळ पैठणी चा हा खेळ घेण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी मनमुराद आनंद लुटत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व सूत्रसंचालन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी शिवसेना पोलादपूर शहर महिला आघाडीच्या अश्विनी गांधी, सारिका पालकर, वैशाली चिकणे, आदिती नगरकर, सारिका अनिल खेडेकर, दुर्वा दरेकर, प्राची सुतार यांच्यासह महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व शहरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम महिलांसाठी सामाजिक एकोपा, आनंद व मनोरंजन यांचा संगम ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.



