पोलादपूर येथून ८५ वर्षीय अनंत दुदुस्कर बेपत्ता, पोलिसांकडून तपास सुरु

पोलादपूर येथून ८५ वर्षीय अनंत दुदुस्कर बेपत्ता, पोलिसांकडून तपास सुरु
पोलादपूर, संदिप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील तांबडभुवन येथील रहिवासी अनंत कोंडीबा दुदुस्कर (वय ८५ वर्षे, रा. तांबड भुवन, ता. पोलादपुर) हे ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०३.३० वाजताचे सुमारास फिरायला जातो असे ईशाऱ्याने सांगून गेले परंतु परत आलेच नसल्याने निलेश अनंत दुदुस्कर, (वय ५३ वर्षे, धंदा-नोकरी, रा. तांबड भुवन, ता. पोलादपुर) यांनी वडील मिसिंग झाल्याची तक्रार १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलादपूर पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे. मिसिंग अनंत दुदुस्कर यांना बोलता येत नसून ऐकायला देखील कमी येते.
मिसिंग व्यक्तीचे वर्णन अनंत कोडिबा दुदुस्कर वय ८५ वर्षे, उंची ५ फुट ५ इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ बांधा, अंगात- नेसुस शेवाळी रंगाची हाप पैंट, काळ्या रंगाची चौकोन असलेली व गुलाबी रंगाचा फूल शर्ट, खांद्यावर भगव्या रंगाचा टॉवेल, कमरेला काळ्या रंगाचा धागा व त्यास लावलेली एक छोटी चावी, हातात लाकडी काठी असे असून कोठेही आढळल्यास पोलादपूर पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



