“सायबर सुरक्षा” प्रश्नमंजुषा स्पर्धेत सेंट झेविअर्स स्कूल चे दैदिप्यमान यश…!!

महाड, वार्ताहर
पुणे सायबर सेल अणि रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायबर सुरक्षितता’ (Be Cyber Safe) हा ज्वलंत विषयावर शालेय विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या जागृती करिता रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील सर्व क्लबला आवाहन करीत या प्रश्न मंजुषा (Quiz contest) स्पर्धेचे आयोजिन करण्यात आले होते. एकूण १४० क्लब पैकी ४२ क्लब मार्फत ५६ शाळांतून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
महाड मधून रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट कडून सेंट झेवियर्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शिरगाव चे नामांकन केले गेले. सप्टेंबर महिन्यात एक ऑनलाईन चाचणी परीक्षा घेतली गेली त्यामधून केवळ १० संघांची अंतिम फेरीकरीता निवड करण्यात आली होती. त्यामध्ये सेंट झेवियर्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शिरगाव या शाळेचा संघ दुसर्या क्रमांकावर होता.
आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे येथे अंतिम फेरी घेण्यात आली. ज्यामध्ये सेंट झेवियर्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा संघ सर्वच फेरीत अव्वल स्थान पटकावत या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला. तर युरो सीबीएसई या शाळेचा संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. सेंट झेवियर्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शिरगाव कडून कु. क्षितिज खरात, कु .कार्तिक बोरगावकर आणि कु.गीत देशमुख यांनी सेंट झेवियर्स च्या संघाचे प्रतिनिधित्व केले. आणि अंतिम फेरीचे विजेते पद मिळविले. विजेत्या संघाचे बुद्धी कौशल्य व सायबर सुरक्षितता या विषयीचे सखोल ज्ञान व बुद्धी चातुर्याच्या जोरावर मिळविलेले हे यश पाहून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे व रोटरी प्रांत पाल श्री संतोष मराठे यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक रोटेरियन विकास सिंग सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रोटेरियन इसाबेला डिसोजा यांचे ही मनापासून खूप कौतुक केले.
या यशाबद्दल रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट चे अध्यक्ष रोटेरियन जॉन्सन डिसोझा, सेक्रेटरी रोटेरियन चेतन पालांडे व खजिनदार रोटेरियन जगदीश वर्तक व रोटेरियन संतोष नगरकर यांच्यासह सर्वच रोटरी परिवाराकडून विजेत्या संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे व शाळेच्या मुख्याध्यापिका या सर्वांचे विशेष अभिनंदन केले.



