# मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात लोहारे ग्रामपंचायतीने कसली कंबर – कोकण न्यूज मराठी
आपला जिल्हामहाराष्ट्र

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात लोहारे ग्रामपंचायतीने कसली कंबर

सरपंच, उपसरपंच, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने लोहारे ग्रामपंचायतीची तयारी एक नंबर

पोलादपूर, संदीप जाबडे

पोलादपूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अशी ओळख असणाऱ्या लोहारे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जोरदार तयारी केली असून पोलादपूर तालुक्यात लोहारे ग्रामपंचायत सरस ठरताना दिसत दिसत आहे. यापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, टीबी मुक्त ग्रामपंचायत, निर्मलग्राम अभियान आदी पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. ग्रामपंचायतीने नागरी सेवा सुविधा अंतर्गत जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र यासाठी नागरी सेवा सुविधा केंद्र उभारले असून ग्रामपंचायतीत तक्रारपेटी बसविली आहे. ग्रामपंचायतीच्या वेबसाईटद्वारे गावच्या भौगोलिक परिस्थिती माहिती तयार करण्यात आली आहे. गावच्या वेशीवरती सिकत्व लावण्यात आले आहेत १५ अपंगांचे UID व निर्वाह मदत वाटप केला आहे. ग्रामपंचायत दफ्तर व १ ते 33 नमुने अद्ययावत केले आहेत. ग्रामविकास समितीचे व इतर समित्यांचे कामकाज सुरळीतपणे सुरु असून मेरी पंचायत/ पंचायत निर्णय / ग्रामसंवाद नागरिकांसाठी अँप डाउनलोड केले आहेत व ग्रामस्थांना माहिती दिली आहे. आयुष्मान भारत कार्ड काढून दिले आहेत. १०% महिला बालकल्याण खर्च फंडातून हळदीकुंकू कार्यक्रम, घरपट्टी ८१% वसुली, लोकवर्गणी जमा, पाणीपुरवठा व विद्युत देयकांची शून्य थकबाकी,अपारंपरिक ऊर्जा व सौर ऊर्जेतून पाणीपुरवठा, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय उपाययोजना केली आहे.

गावामध्ये वृक्षलागवड, प्लास्टिक बंदी केली असून कापडी पिशवी वाटप करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनाद्वारे ग्रीन फाउंडेशन सुका कचरा गोळा करतात. कचरा पेट्या वाटप केल्या असून सुका व ओला कचऱ्यासाठी/ सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येक घरात वैयक्तिक शोषखड्डे बांधले आहेत. १० घरकुल पूर्ण झाली आहेत, ग्रामपंचायत सुशोभीकरण मिटिंग हॉल/स्वतंत्र बैठक व्यवस्था / पिण्याचे पाणी / रंगरंगोटी व स्वच्छता गृह/दिव्यांगासाठी रॅम्प या सुविधा केल्या आहेत. शाळा डिजिटल केल्या आहेत / पिण्याच्या पाण्याची सुविधा / स्वच्छता गृह / हँडवॉश स्टेशन/परसबाग/किचन शेड/ शाळेत CCTV लावले आहेत. वनराई बंधारे, रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्व शासकीय कार्यालयात करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीत उमेद मार्फत ३२ महिला बचत गट व दोन ग्रामसंघ तयार करण्यात आले आहेत. विविध प्रकारचे व्यवसाय सुरु आहेत. महिला बचत गट अंतर्गत परसबागेची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेद अंतर्गत लखपती दीदी व महिला सक्षमीकरण झालेले आहे.
यासाठी यासाठी सरपंच दिपक पवार, उप सरपंच संदेश नरे, सदस्य पांडुरंग नरे, लिलाजी शेडगे, श्रीकांत निकम, सुषमा पवार, प्रतिभा सुर्वे, कविता मांढरे, मनिषा साळवी, नंदा पवार,नथुराम नरे, संभाजी साळुंखे, रामचंद्र साळुंखे, अशोक नरे,प्रदीप नरे, हरिश्चंद्र साळुंखे, निलेश वाडकर, सोनू सकपाळ, प्रविण तुर्डे, शांताराम पवार यांसह ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय शिक्षक वृंद, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, एकता महिला महासंघ व समता महिला महासंघ यांनी कंबर कसली असून लोहारे ग्रामपंचायतीस तालुका स्तरीय पुरस्कार १००% मिळणार असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!