साने गुरुजी विद्यालय लोहारे येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबीर व विशेष कार्यशाळा संपन्न

पोलादपूर, संदीप जाबडे
सार्वजनिक आरोग्य विभाग व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पोलादपूर, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी विद्यालय लोहारे येथे किशोरवयीन मुलींना पौगंडावस्थेतील शारीरिक बदल शंका व समाधान याबाबत आरोग्य कार्यशाळा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाली.
या आरोग्य कार्यशाळेत पोलादपूर तालुक्याच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनींना आपल्या आरोग्य बाबतच्या तक्रारी विषयी डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलून आपल्या आरोग्याच्या समस्यांबाबत संवाद साधून माहिती घेणे आवश्यक असल्याची जाणीव यावेळी बोलताना करून दिली. यावेळेस या विषयावर डॉ. पल्लवी साळुंखे, डॉ. अनिल काकड (वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र पळचील) यांनी विद्यार्थिनी व उपस्थितांना पौगंडावस्थेतील शारीरिक बदलाबाबत शंका व समाधान, मासिक पाळीतील घ्यावयाची शारीरिक काळजी,गुड टच-बॅड टच याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच निलेश मोरे ( तालुका आरोग्य सहाय्यक महाड) यांनी संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांची सुसंवाद साधून माहिती देण्यात आली.
या आरोग्य कार्यशाळेस गटविकास अधिकारी दिप्ती गाट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुशीम भारसाकळे,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे, आपला दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनावणे,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर पवार, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र पळचील डॉ. अनिल काकड, डॉ. पल्लवी साळुंखे, सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, कोषाध्यक्ष सुखदेव मोरे, विश्वस्त सुभाष ढाणे, मुख्याध्यापिका माधवी देशमुख, शिक्षक वृंद तसेच तालुका आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका हे उपस्थित होते.



