# बौद्धजन सेवा संघाच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ शिर्के, सरचिटणीस पदी प्रविण पवार तर खजिनदार पदी प्रकाश जाधव विराजमान – कोकण न्यूज मराठी
सामाजिक

बौद्धजन सेवा संघाच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ शिर्के, सरचिटणीस पदी प्रविण पवार तर खजिनदार पदी प्रकाश जाधव विराजमान

गुप्त मतदान प्रक्रियेतून नवीन कार्यकारिणीची निवड

पोलादपूर, संदीप जाबडे

बौद्धजन सेवा संघ मुंबई पोलादपूर या संस्थेच्या नवीन कार्यकारिणीची निवड गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया मा. अध्यक्ष विजय सोनावणे, अध्यक्ष आर एस जाधव,मा. उपाध्यक्ष काशिनाथ मोरे, मा. सरचिटणीस संजय खैरे, मा. उपचिटणीस रूपेश जाधव, मार्गदर्शक आर डी मोरे, गोपाळ गमरे, पंकज मोरे, लाकेश गायकवाड, शशिकांत खैरे, राहुल मोरे, दर्शन पवार,सुभाष पवार यांच्या अधिपत्याखाली पार पडली. बौद्धजन सेवा संघाच्या पात्र ७०९ सदस्यांपैकी २५१ सदस्यांनी गुप्त मतदानाचा हक्क बजावला.

 

यामध्ये अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतीत ओंबळी गावचे सिद्धार्थ शिर्के ९२ मते मिळवून विजयी झाले. उपाध्यक्षपदी वाकण गावचे सोनु जाधव १५६ मते, सरचिटणीसपदी साखर गावचे प्रवीण पवार १३६ मते, उपचिटणीस पदी कुडपण गावचे सिद्धार्थ सोनावणे, खजिनदार पदी कोंढवी गावचे प्रकाश जाधव, संघटक पदी विठ्ठल मोरे, हिशोब तपासणीस स्वप्नील मोरे यांची वर्णी लागली. सर्व नवनिर्वाचित कार्यकारणीचे समस्त बौद्धजन सेवा संघ मुंबई पोलादपूर यांचे वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!