# रायगडच्या युवा पलटण ने जिंकली कबड्डी रसिकानंची मने – कोकण न्यूज मराठी
क्रीडा

रायगडच्या युवा पलटण ने जिंकली कबड्डी रसिकानंची मने

आज रायगड विरुद्ध अहिल्यानगर सेमीफायनलचा धरार

रोहा, रुपेश रटाटे

रायगडच्या युवा पलटण ची ७३व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सांगली जिल्ह्यावर शानदार मात करून सेमीफायनलमध्ये धडक मारत रायगड वासियांची मने जिंकली आहेत. नाशिक येथील सिन्नर येथे या महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद स्पर्धा सुरु आहे. बाद फेरीतील विजयी खेळीमुळे आत्ता रायगडकरांच्या अपेक्षा आत्ता उंचावल्या आहेत. रायगड च्या युवा संघाची कामगिरी म्हणजे, राज्यातील दिग्गज संघाला धडकी भरवणारा राहिला आहे. सर्वच स्तरावरून प्रशिक्षक, संघव्यवस्थापक तसेच निवड समितीचे अभिनंदन केले जात आहे.

उप उपांत्यफेरीची लढत हृदयाचा ठोका चुकविणारी राहिली होती. त्या प्रामुख्याने राज मोरे यांच्या अफलातून सुपर टॅकल नी प्रतिस्पर्धी संघाला सलो कि पळो करून ठेवलं होत. निर्णायक,पकड्डी च्या जोरावर तर नीरज मिळास, विपुल मोकळ राज मोरे, राज जंगम यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सांगली सारख्या मजबूत संघावर 2 गुणांनी विजय मिळवत,सेमी फायनल मध्ये थेट प्रवेश मिळविला आहे. उद्या सायंकाळी रायगड विरुद्ध अहिल्यानगर असा सामना होईल. महत्वाच्या लढतीला कबड्डी प्रेमी, खेळाडू, प्रेक्षकानी सोशल मीडियावर शुभेच्छा देत रायगड कर अंतिम विजयाची प्रतीक्षा करीत आहेत

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!