केस्तुली प्रिमियर लिग चा थरार; “एक गाव एक संघ” भावनेतून क्रिकेटच्या माध्यमातून एकतेचा संदेश

रायगड, विकास आग्रे
माणगांव येथील केस्तुली या गावातील श्री दत्तगुरू क्रिकेट संघ केस्तुली या संघाच्या वतीने केस्तुली प्रिमियर लिग क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. सदर सामन्यात एकुन सहा संघानी सहभाग घेतला होता. यातील सहा ही संघात मोठी चुरशीची लढत होताना पाहायला मिळाली. अखेर यात शेवटचे तीन संघ विजयी म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक महेश ११ फायटर्स संघ, द्वितीय क्रमांक सुरज स्ट्राईकर्स, तर तृतीय क्रमांक दिपक डेअरडेव्हिल्स या संघाने प्राप्त केला.
यामध्ये सामनावीर आणि उतम्हणून ठरला तो करण शिगवण , उत्कृष्ट फलंदाज ठरला तो वेदांत शिगवण, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चेतन शिगवण यांनी आपल्या संघाच्या विजयासाठी आपले योगदान दिले. एकंदरीत सर्वच सामने हे अतिशय शिस्तबद्ध, मैत्रीपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडले. एक गाव एक संघ या भावनेतून क्रिकेटच्या माध्यमातून एकतेचा संदेश हा या श्री दत्तगुरू क्रिकेट संघाने दिला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.



