# साने गुरुजी विद्यालयास ‘आदर्श विद्यालय’ पुरस्काराने गौरव – कोकण न्यूज मराठी
क्रीडा

साने गुरुजी विद्यालयास ‘आदर्श विद्यालय’ पुरस्काराने गौरव

पोलादपूर, संदीप जाबडे

बौद्धजन सेवा संघ व महापुरुष जयंती उत्सव समितीच्या वतीने साने गुरुजी विद्यालयाचा ‘आदर्श विद्यालय’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा सन्मान भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या साने गुरुजी विद्यालयाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यालयाच्या कार्याची पोचपावती मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते तसेच बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कारामुळे विद्यालयाच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प मुख्याध्यापिका माधवी देशमुख यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!