# राज पार्टे छत्रपती शिवराय कर्तृत्वभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित – कोकण न्यूज मराठी
सामाजिक

राज पार्टे छत्रपती शिवराय कर्तृत्वभूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

पोलादपूर, संदीप जाबडे

पोलादपूर तालुक्यात सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे “आपली माती आपली माणसं” या सामाजिक संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांना छत्रपती शिवराय कर्तृत्वभूषण पुरस्कार २०२६ प्रदान करून भव्य सन्मान करण्यात आला. समाजासाठी सातत्याने झटणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याच्या रूपाने राज पार्टे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट, उपस्थितांची मोठी गर्दी आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली होती. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज पार्टे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

 

राज पार्टे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, “आपली माती आपली माणसं” या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, प्रवासी अडचणी, शासकीय कार्यालयांतील तक्रारी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी लढा दिला आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला असून, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम त्यांनी केले आहे.

या गौरवामुळे राज पार्टे यांच्या कार्याला नवसंजीवनी मिळाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलादपूर तालुक्यासह संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज पार्टे यांच्या या सन्मानामुळे “आपली माती आपली माणसं” या संघटनेचेही नाव उंचावले असून, भविष्यात आणखी व्यापक स्तरावर समाजकार्य करण्याचा त्यांचा निर्धार अधिक बळकट झाला आहे. समाजासाठी निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांना मिळणारा हा सन्मान इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

चौकट

“हा मानाचा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मी केलेल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार. हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे. आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. याच प्रेरणेतून मी समाजासाठी अधिक जोमाने काम करत राहीन.”

– राज पार्टे(संस्थापक, आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था)

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!