नवीन व जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्रित मिळून काम करा : मंत्री भरत गोगावले
तुर्भे खुर्द येथील राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पोलादपूर, संदीप जाबडे
रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यातच गावोगावी पक्षप्रवेशाचा धडाका आज सुरू आहे. शनिवार 22 नोव्हेंबर 2025 रोजी तुर्भे खुर्द ग्रामपंचायतीतील रायबा घराणे भावकीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, मनसे, शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य ओंकार उतेकर,ग्रामपंचायत सदस्य चंद्राबाई दळवी,ग्रामपंचायत सदस्य अविनाश उतेकर, समाजसेवक विष्णू उतेकर,मंगेश उतेकर, सुनिल उतेकर, प्रदीप उतेकर, गणेश उतेकर, संतोष उतेकर, दगडू उतेकर, मारुती उतेकर, अरुण उतेकर, रामदास उतेकर,धोंडीराम दळवी, यशवंत दळवी, अशोक उतेकर यांचं शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.
मंत्री भरत गोगावले यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे गळ्यात भगव्या पताका घालून शिवसेना शिंदे गटात स्वागत केले. तुम्ही मतपेटीमध्ये विकास दाखवा, आम्ही तुमच्या गावची उर्वरित कामे करून सर्वांगीण विकास करू असा शब्द मंत्री गोगावले यांनी प्रवेशकर्त्यांचे दिला. तुर्भे विभागात शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असतानाच नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधून एकत्र येऊन जोमाने काम करा विजय आपलाच होणार तर येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पक्षप्रवेश सोहळ्याला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख अनिल भिलारे, ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर, अनिल पवार, रामचंद्र साळुंखे, शहर प्रमुख सुरेश पवार, महिला आघाडी तालुका प्रमुख सुवर्णा कदम, शौकत तारलेकर,शैलेश सलागरे,सतिश शिंदे,केशव खेडेकर यासह पक्ष प्रवेश घडवून आणण्यासाठी माजी सरपंच गणेश उतेकर,शाखाप्रमुख तुकाराम उतेकर, नरेश उतेकर, संदेश कदम, यशवंत उतेकर, विनोद वायकर, रमेश उतेकर, उषा निवृत्ती उतेकर, रंजना अशोक मोरे, रेणुका उतेकर यांनी मेहनत घेतली.



