चांभारगणी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्यासह कार्यकर्त्यांचा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती

चांभारगणी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्यासह कार्यकर्त्यांचा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
पोलादपूर, संदीप जाबडे
महाड विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकांचे वारे हे जोरदार वाहू लागले असून पक्षप्रवेशाचा धुमधडाका सुरू आहे. गुरुवार 20 नोव्हेंबर 2025 रोजी पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी खुर्द ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य सहदेव शंकर येरापले व कार्यकर्त्यांनी नामदार मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये भिवा सकपाळ, विठोबा येरापले, पांडुरंग येरापले, नारायण सकपाळ आदींनी पक्ष प्रवेश केलाय या प्रवेशामुळे संपूर्ण चांभारगणी खुर्द गाव शिवसेना-मय झाल्याचे वातावरण पाहायला मिळाले.
पक्षप्रवेश कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश आहिरे, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, तानाजी निकम, ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष अनिल दळवी, शांताराम गोळे, शैलेश सलागरे, नगरसेवक नागेश पवार, विनायक दीक्षित, विक्रम भिलारे स्वप्निल चोरगे, नरेश सलागरे आदी मान्यवर उपस्थित होते.



