कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या सभेला मुंबई येथे उत्स्फूर्त प्रतिसाद, शिवसेना शेकाप युतीची प्रचारात मुसंडी

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने भूमिका बदलल्याने शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय : एकनाथ गायकवाड
पोलादपूर, संदीप जाबडे
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाने सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. परंतु महाविकास आघाडीच्या महाड विधानसभेच्या नेत्यांनी सातत्याने भूमिका बदलल्याने आम्ही शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला असे मत शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले. शिवसेना पक्षाने मोठे मन करून माटवण पंचायत समिती गणाची जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडल्याने शिवसैनिकांचे आभार मानले. शिवसेनेचे लोहारे जि.प.गटाचे उमेदवार चंद्रकांत कळंबे, लोहारे पं.स.गणाच्या उमेदवार अनिता भिलारे, कोतवाल बुद्रुक पं.स.गणाचे उमेदवार अविनाश शिंदे, कापडे बुद्रुक जि.प.गटाचे उमेदवार डॉ.निलेश कुंभार, कापडे बुद्रुक पं.स.गणाचे उमेदवार अनिल दळवी आणि शेकापक्षाच्या माटवण पं.स.गणाच्या उमेदवार साक्षी कांबळेकर यांची प्रचारसभा मुंबई येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.
पोलादपूर तालुक्यातील वाड्या वस्त्यांमध्ये शिवसेना पक्ष व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास पोहोचला आहे. इतर पक्षाचे कार्यकर्ते फक्त निवडणुकांपुरते दिसतात त्यामुळे पोलादपूर तालुक्यात शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व जागा निवडून येतील असा विश्वास आयोजित सभेतून मुंबईस्थित चाकरमान्यांनी व्यक्त केला.
यावेळी लोहारे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चंद्रकांत कळंबे, कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर निलेश कुंभार, लोहारे पं.स.गणाच्या उमेदवार अनिता भिलारे, कोतवाल बुद्रुक पं.स.गणाचे उमेदवार अविनाश शिंदे, कापडे बुद्रुक जि.प.गटाचे उमेदवार डॉ.निलेश कुंभार, कापडे बुद्रुक पं.स.गणाचे उमेदवार अनिल दळवी, शेकापक्षाच्या माटवण पं.स.गणाच्या उमेदवार साक्षी कांबळेकर, शिवसेना संपर्कप्रमुख किशोर जाधव, शेतकरी कामगार पक्ष विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, निलेश कोळसकर, राजू रिंगे, अनिल भिलारे, चंद्रकांत सणस,शैलेश सलागरे, भरत चोरगे, बोरघरचे कृष्णा कदम आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पूर्वीचा सोबती शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षासोबत आल्याने शिवसेना पक्षाची ताकद अधिकच वाढली असून दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समिती जागांवर शिवसेना शेकाप युतीचे उमेदवार १००% विजयी होतील असा विश्वास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला.



