देवा बॉईज यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
दान धर्म करीत "देवा" च्या स्मृतींना श्रद्धांजली

मुंबई : मितेश नवले
महाड तालुक्यातील रावढळ गावातील स्वर्गीय देवेंद्र (देवा) रेशीम यांच्या ५ व्या पुण्यस्मरणानिमित्त देवा बॉईज दिवा (महाड) यांनी मित्रांच्या आठवणींना सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम हाती घेत आशीर्वाद मुलांचे घर डोंबिवली पश्चिम या ठिकाणी लहान मुलांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, आरोग्य साहित्य, तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अनोखी मैत्री ची व्याख्या जपत देवा” च्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी देवा बॉईज दिवा महाड चे अध्यक्ष महादेव तांबे, उपाध्यक्ष परेश रेशीम , सचिव विशाल देवळे, सल्लागार नितेश रसाळ, नितेश सुकुम, रोशन बैकर, सचिन बैकर, अनिकेत चव्हाण तसेच सदस्य ऋतिक बैकर ,ऋषी रेशीम,ऋतिक बैकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्वर्गीय देवेंद्र रेशीम, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम पाहिले होते, रेशिम बंधू परिवार सामाजिक विकास या संस्थेचा सभासद, अन्य सामाजिक संस्थेत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची छाप पाडली होती, सन 2020 मध्ये त्यांचे अल्पशा आजाराने निधन, त्यांच्या सामाजिक बांधिलकी जपत, देवा बॉईज दिवा महाड, ग्रुपची स्थापना झाली.
त्यांच्या जवळच्या मित्रांनी उभारल्या ग्रुपच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा माध्यमातून सामजिक बांधिलकी म्हणून अनाथआश्रमामध्ये गेली 4 वर्षापासून मदत करण्यात येत असल्याचे अध्यक्ष महादेव तांबे यांनी सांगितले. देवेंद्र च्या स्मरणार्थ समाजकार्यात सातत्य ठेवण्याचा निश्चय या देवा बॉईज यांनी उपक्रमावेळी व्यक्त केले.


