पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे स्वप्न साकार होणार; नगराध्यक्ष पदासाठी स्नेहा मेहता यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिवसेनेकडून दाखल

पोलादपूर, संदिप जाबडे
पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी स्नेहा सचिन मेहता यांचा एक मात्र नामांकन १८ नोव्हेंबर रोजी पोलादपूर नगरपंचायत मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे निवडणूक कार्यक्रम प्रणालीनुसार दाखल करण्यात आले. तर सदर निवडणूक प्रक्रियेचे पिठासीन अधिकारी म्हणून पोपट ओमासे उपविभागीय अधिकारी, महाड यांच्याकडून छाननी करण्यात आली.
पोलादपूर नगरपंचायत शिवसेना पक्षाचे गटनेते मनोज प्रजापती यांनी पक्षप्रणालीनुसार निवडणूक प्रक्रियेला उपस्थित राहण्यासंदर्भात दिलेल्या सूचनेनुसार सर्व नगरसेवक, नगरसेविका वेळेत उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले. गटनेते मनोज प्रजापती यांच्यासह उमेदवार स्नेहा मेहता, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, नगरसेवक नागेश पवार,सिद्धेश शेठ, विनायक दीक्षित, निखिल कापडेकर, नगरसेविका सोनाली गायकवाड, शिल्पा दरेकर, अस्मिता पवार, मृगया शहा यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी नगराध्यक्षा म्हणून स्नेहा मेहता यांचा अर्ज दाखल करताना दक्षिण रायगड नेते चंद्रकांत कळंबे, शहर प्रमुख सुरेश पवार, युवासेनेचे संजय कळंबे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड ,ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र साळुंखे, पांडुरंग वरे इत्यादींची उपस्थिती राहिली.
निवडणूक कार्यक्रमांनुसार एकमेव अर्ज दाखल झाल्याने स्नेहा मेहता यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार असून २५ नोव्हेंबरला पदभार स्विकारणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.



