स्वदेस फॉउंडेशन मार्फत माझं गाव माझं गौरव २०२५ स्पर्धेमध्ये रायगड मधिल पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द गाव विजयी

पोलादपूर, संदिप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील श्री राम गाव विकास समिती तुर्भे खुर्द गावाने मागील महिन्यात स्वदेस फॉउंडेशन मार्फत काम चालू असलेल्या सर्व जिल्हातील तालुक्यातील गावांसाठी समुदायासाठी माझं गाव, माझं गौरव २०२५ ही स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये तुर्भे खुर्द गाव विकास समिती विजेते झाले आहेत. पोलादपूर मध्ये सर्वच बाबतीमध्ये अग्रेसर असलेले गाव म्हणजे तुर्भे खुर्द. या गावात एकूण 180 घरे चालू आहेत. यामध्ये जवळ जवळ 92 कुठूबांना उत्पन्न वाढीसाठी प्रकल्प दिले आहेत. त्या पद्धतीने काम चालू आहे. शासनाच्या विविध योजना गावामध्ये राबविल्या आहेत. तसेच स्वप्नातील गाव जाहीर करताना यामध्ये स्वच्छ, सुंदर, स्वास्थ, समृद्ध, साक्षर या 5 सूत्रवर काम करून 90% कामे पूर्ण केली आहेत.हे सर्व करण्यासाठी गाव विकास समिती ने विशेष प्रयत्न केले आहेत सोबतच आता मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत साठी सहभाग घेतला आहे.



