# किल्ले रायगडावर “शिव संस्कार” रायगड शिवबाची युवा पिढीची स्वच्छता मोहीम – कोकण न्यूज मराठी
महाराष्ट्र

किल्ले रायगडावर “शिव संस्कार” रायगड शिवबाची युवा पिढीची स्वच्छता मोहीम

महाड, विकास आग्रे

शिव संस्कार रायगड (शिवबाची युवा पिढी)यांच्या पुढाकाराने स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर रविवार,दिनांक ११ जानेवारी रोजी पायरी मार्गावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अनेक शिवभक्त युवकांनी यात सहभाग घेत पायरी मार्गावरील प्लास्टिक पिशव्या,बाॅटल्स उचलून परिसर स्वच्छ केला.तसेच मोहीमेची सुरुवात पहील्या पायरीचे नतमस्तक दर्शन घेऊन करण्यात आली. गड-किल्यांची स्वच्छता आणि तेथील पावित्र्याची जपणूक करण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे तसेच या ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपले पाहिजे मत विकास आग्रे यांनी व्यक्त केले.या मोहिमेत शिव संस्कार रायगड (शिवबाची युवा पिढी) परिवारातील सर्व शिवभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.या स्वच्छता मोहीमेतुन युवा पिढीसमोर एक चांगला आदर्श ठेवला असल्याने या मोहिमेचे सर्वच स्तरातून आनंद व्यक्त होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!