# कापडे येथे श्री साई भंडारा उत्सव उत्साहात संपन्न – कोकण न्यूज मराठी
धार्मिक व आध्यात्मिक

कापडे येथे श्री साई भंडारा उत्सव उत्साहात संपन्न

पोलादपूर, संदीप जाबडे

पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथील साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने बुधवार, दि. ०४ मार्च २०२६ रोजी भव्य श्री साई भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात पोलादपूर तालुक्यातील व परिसरातील हजारो साईभक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री साईनाथ मित्र मंडळ, कापडे बु. साई भवानी नगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर साईमंत्र जप, पादुका पूजन व अभिषेक, होम-हवन, सत्यनारायण महापूजा तसेच ज्ञानेश्वरी नववा अध्यायाचे वाचन अशा धार्मिक विधींनी परिसर भक्तिमय झाला.दुपारी १२ ते १ या वेळेत साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. सायंकाळी पालखी दिंडी सोहळा मोठ्या जल्लोषात काढण्यात आला. सायंकाळी साईबाबांची महाआरती संपन्न झाली. रात्री ८ ते १२ या वेळेत महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष आकर्षण म्हणून ओमकार महाडिक व नवयुग साई भजन मंडळ (प्रस्तुत – गजर साईनामाचा) महाडीक व सहकलाकार यांच्या भजनांनी उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित सर्व मान्यवर व देणगीदारांचा मंडळी सत्कार हि करण्यात आला संपूर्ण परिसरात जणू शिर्डी अवतरल्याचा भास होत होता. ग्रामपंचायत समोर, साई भवानी नगर येथे आयोजित या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. श्री साईनाथ मित्र मंडळ, कापडे बु. यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडला.या भक्तिमय वातावरणात पार पडलेला श्री साई भंडारा उत्सव भाविकांच्या मनात श्रद्धा व भक्तीची नवी ऊर्जा निर्माण करून गेला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!