महाराष्ट्रराजकीय
पोलादपूर तालुक्यात चित्रलेखा पाटलांच्या फोटोला जोडे मारत निषेध
मंत्री भरत गोगावलेंचा खोटा व्हिडिओ दाखवल्याचा शिवसैनिकांचा दावा

पोलादपूर, संदिप जाबडे
शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवींचा पैशांनी भरलेल्या बॅगांसोबतचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये दाखवून एकच खळबळ उडवली. यावर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु असून शिवसैनिकांनी व आमदार महेंद्र दळवी यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला. यातच शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रालेखा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री नामदार भरत गोगावले यांचा पैशांनी भरलेल्या बॅगांसोबतचा व्हिडिओ प्रसार माध्यमांसमोर दाखवून एकच खळबळ उडवली. मंत्री भरत गोगावलेंचा हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा शिवसैनिक व मंत्री गोगावलेंनी केला. हा व्हिडिओ दाखवून मंत्री गोगावलेंची बदनामी केल्याने पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर शिवसैनिकांनी चित्रालेखा पाटील यांच्या फोटोला जोडे
निषेध नोंदविला.
यावेळी दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, नगराध्यक्ष स्नेहा मेहता, युवासेना संपर्कप्रमुख विजय शेलार, विक्रम भिलारे, नगरसेवक विनायक दीक्षित, नागेश पवार राजेश डांगे, दत्ता मोरे, सुनिल तळेकर, अनिल दळवी, प्रसाद मोरे, प्रसाद पवार, गणेश येरूणकर, विभाग संघटिका गीता दळवी, उद्योजक रामदास कळंबे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



