उंबरकरकोंड–पार्टेकोंड येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण
गावा गावात शिवस्मारक व्हायला हवे : चंद्रकांत कळंबे

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील उंबरकोंड–पार्टेकोंड येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे नूतनीकरण करून त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले. युवासेना कोअर कमिटी सदस्य तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते या स्मारकाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले.
या वेळी परिसरातील नागरिकांसह मुंबई, पुणे आणि गुजरात येथे नोकरी-व्यवसायासाठी स्थायिक असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त वैद्यकीय तपासणी शिबीर, महिलांसाठी होम मिनिस्टर, हळदीकुंकू, लोहारमाळ पोलादपुर ते श्री क्षेत्र उंबरकोंड-पार्टेकोंड लेझीम पथक, मिरवणूक, शिवशाहीर विठोबा साळवी यांचा पोवाडा आदी कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमादरम्यान शिवाजी महाराजांच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले. गावकऱ्यांच्या व चाकरमानींच्या सहकार्याने उभारण्यात आलेले हे स्मारक परिसरातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पोलादपूर तालुका ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची इतिहासाची आणि शौर्याची साक्ष देणारी आहे. सूर्याजी मालुसरे, शेलारमामा यांचे वास्तव लाभलेली ही भूमी आहे. यामुळेच पोलादपूर तालुक्यातील गावागावात शिवस्मारक व्हायला हवे ही आमची इच्छा आहे. यासाठी काही मदत लागल्यास आम्ही मदत करू असे आश्वासन शिवजयंती निमित्त मार्गदर्शन करताना चंद्रकांत कळंबे यांनी दिले. कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद सदस्य निलेश कुंभार, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम, शिवसेना विभागप्रमुख अनिल भिलारे, दीपक उतेकर, विक्रम भिलारे, प्रवीण महाडिक यांसह विविध सामाजिक- राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिवस्मारकाच्या नूतनीकरणासाठी हनुमान मित्र मंडळ मुंबई कमिटी अध्यक्ष जयराम सकपाळ, उपाध्यक्ष तुकाराम पार्टे, सेक्रेटरी दिपक पार्टे,खजिनदार विनोद पार्टे, वसई अंधेरी विभागाचे दिनेश पार्टे, गणपत सकपाळ,घाटकोपर विभागाचे रूपेश सकपाळ, सुभाष मांढरे,ठाणे विभागाचे दिलीप पार्टे, गणेश सकपाळ, अंबरनाथ विभागाचे नरेश सकपाळ, कृष्णा सकपाळ, सिताराम सकपाळ, सल्लागार दाजी सकपाळ, सखाराम सकपाळ, ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष जनार्दन सकपाळ, सोनु सकपाळ, धोंडीराम पार्टे, दिनेश सकपाळ, नामदेव उंबरकर, अशोक पार्टे, भिकु पार्टे, जानु सकपाळ, बाळाराम वाडकर,सुरेश सकपाळ,बडोदा पुणे विभागाचे चंद्रकांत पार्टे, वसंत सकपाळ, धोंडीराम पार्टे आदींनी विशेष मेहनत घेतली.



