# सावित्री नदीतील डंम्पिंग ग्राऊंडविरोधात तीव्र आंदोलन; प्रशासन धारेवर – कोकण न्यूज मराठी
महाराष्ट्र

सावित्री नदीतील डंम्पिंग ग्राऊंडविरोधात तीव्र आंदोलन; प्रशासन धारेवर

पोलादपूर, संदीप जाबडे

सावित्री नदीपात्रात सुरू असलेल्या डंम्पिंग ग्राऊंडविरोधात “आपली माती, आपली माणसं” या सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदविला.

 

संस्थेचे संस्थापक राज पार्टे व अध्यक्ष निलेश कोळसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी थेट नदीपात्रातील डंम्पिंग ग्राऊंडस्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी “आपली माती, आपली माणसं” संस्थेकडून स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली.

 

दरम्यान, कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याशी राज पार्टे यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी एका महिन्याच्या आत डंम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिले असल्याची माहिती देण्यात आली. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच पोलादपूर शहर तक्रार निवारण कक्षाचा पाठिंबा मिळाला. पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले.

 

या वेळी संस्थापक राज पार्टे, अध्यक्ष निलेश कोळसकर, ग्रामीण अध्यक्ष हरी पवार, कार्याध्यक्ष शिवाजी मालुसरे, प्रवक्ते संभाजी पार्टे, पत्रकार शैलेश पालकर, ग्रामीण कमिटी प्रवक्ते दीपक उतेकर यांच्यासह नगरपंचायत मुख्याधिकारी विनय शिपाई, नगराध्यक्षा स्नेहा मेहता, उपनगराध्यक्ष नागेश पवार, विरोधी पक्ष नेते दिलीप भागवत तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!