रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उत्कृष्ट सहभागाबद्दल सन्मान

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उत्कृष्ट सहभागाबद्दल सन्मान
पोलादपूर, संदीप जाबडे : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत , पेण-रायगड यांच्या वतीने सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून मोलाचे योगदान दिल्याबद्दल दीपक बाबाजी उतेकर (पोलादपूर) व अरुण गजानन मोहिते यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ या संदेशावर आधारित या उपक्रमात नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत दीपक उतेकर व अरुण मोहिते यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रभावी सहकार्य केले.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड यांच्या वतीने देण्यात आलेल्या या सन्मानामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक होत असून, भविष्यातही अशाच प्रकारे समाजहिताच्या उपक्रमात सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी अधिकाऱ्यांनी “आपणास अपघातमुक्त भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा” असा संदेश देत सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.



