कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटासाठी डॉ. निलेश काशिनाथ कुंभार इच्छुक
शिवसेनेतून उमेदवारी मिळाल्यास तालुक्याचा कायापालट करणार : डॉ. निलेश काशिनाथ कुंभार

पोलादपूर, संदिप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी वाकण गावचे ज्येष्ठ समाजसेवक काशिनाथ कुंभार व माजी जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार यांचे सुपुत्र डॉ. निलेश काशिनाथ कुंभार हे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून इच्छुक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आयआयटी इंदौर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पूर्ण केली असून काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपले संशोधन कार्य यशस्वीरित्या संपन्न केले. संशोधनादरम्यान त्यांची जपानमध्ये नामांकित संशोधन संस्थेत निवड झाली, जिथे त्यांनी ५ महिने प्रगत संशोधन कार्य केले. याशिवाय ७-८ परदेश दौऱ्यांद्वारे आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला. भारतीय आणि परदेशी संशोधकांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. स्थानिक प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव – आईसोबत काम करताना मिळालेली शिकवण
डॉ. निलेश सांगतात:
डॉ. निलेश कुंभार हे उच्चशिक्षित तरुण उमेदवार असून “आईच्या जिल्हा परिषद सदस्यत्वाच्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या २ वर्षांत सोबत प्रत्यक्ष राहून ग्रामविकास कार्याचे धडे घेतले. अनेक सभागृह बैठका, निर्णयप्रक्रिया, निधी मंजुरी, आणि विविध योजनांचे प्रत्यक्ष अमलबजावणी कशी केली जाते याचा अभ्यास केला. त्यांचा कार्यकाळ संपलेला असला तरी त्या काळात मिळालेल्या अनुभवामुळे लोकांच्या प्रश्नांना प्रामाणिकपणे हाताळून त्यांचे निराकरण करण्याची इच्छा आणि जबाबदारीची भावना माझ्यात अधिक दृढ झाली..”
या अनुभवामुळे गावकुसापासून तालुक्यापर्यंत प्रशासन कसे काम करते, योजना कशा आणल्या जातात, प्रस्ताव मंजूर कसा होतो, निधी कसा मिळवायचा, आणि जनता प्रशासनापर्यंत कशी पोहोचते हे समजण्यास त्यांना मदत झाली.
विकासाचा रोडमॅप आणि मिशन
शिक्षणामुळे आणि अनुभवामुळे शासन योजनांचा अभ्यास करून त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम डॉ निलेश कुंभार प्रामाणिकपणे करणार आहे. लोकांचे प्रश्न पारदर्शकपणे सभागृहात मांडून मंजूरी मिळवणे, आवश्यक निधी मंत्रालयातून आणणे आणि प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करणे हे डॉ कुंभार यांचे स्वन आहे.
कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून चार उमेदवार इच्छुक असून यामध्ये तरुण सुशिक्षित उमेदवाराच्या गळ्यात माळ पडणार कि पक्ष आणखी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



