विकासशेठ गोगावले मंडळ आयोजित हरिपाठ महोत्सवात माऊली कृपा भजनी मंडळ ढवळे प्रथम क्रमांकाचा मानकरी

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर तालुका हा वारकरी सांप्रदायाचा पाया आहे. याच तालुक्यातील वारकरी मंडळीनी एक नाविन्यपूर्ण संकल्पनेच्या माध्यमातून हरिपाठ महोत्सव २०२५ भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन मंगलमूर्ती पार्क येथे करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमा भरत गोगावले यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. सदरचा हरिपाठ महोत्सव दोनदिवसीय कार्यक्रमाच्या मध्ये तालुक्यातील १२ हरिपाठ भजन मंडळानी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमाला एकूण कार्यक्रमाला प्रमुख परिवेक्षक म्हणून महाराष्ट्र नामवंत ओळखले जाणारे हभप यशवंत महाराज खामकर,ह.भ.प दिपक महाराज दसवडकर यांच्या निरीक्षणाखाली ही हरिपाठ महोत्सव स्पर्धा संपन्न झाली. त्यात उत्तेजनार्थ पारितोषिक जननी कुंभजाई भजन मंडळ करंजे तर चतुर्थ क्रमांक विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ सडलली तृतीय क्रमांक कै रामचंद्र महाराज पार्टे हरिपाठ कोतवाल द्वितीय क्रमांक संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ बोराज तसेच प्रथम क्रमांक मानकरी माऊली कृपा भजनी मंडळ ढवळे ठरले.
कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण समारंभ प्रमुख उपस्थिती म्हणून सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, भाजपा उपाध्यक्ष मनोज भागवत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगराध्यक्ष स्नेहा मेहता, भाजपा तालुका अध्यक्ष वैभव चांदे, कापडे सह संपर्क प्रमुख कृष्णा कदम, डॉक्टर संजय शेठ, निवृत्ती महाराज मोरे,नायक मराठा समाज तालुकाध्यक्ष सुनील मोरे, माजी सरपंच भरत चोरगे, डॉ निलेश कुंभार, स्वप्निल चोरगे,नगरसेवक नागेश पवार, नगरसेवक विनायक दीक्षित, सरपंच संघटना अध्यक्ष राकेश उतेकर, बांधकाम कामगार सेना तालुका अध्यक्ष दत्ता मोरे, हभप अनंत घाडगे,युवासेना शहर अधिकारी प्रसाद मोरे, नरेश सलागरे, राजेश डांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हरिपाठ उत्सव संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम मोरे यांनी केले तर सर्व कार्यक्रमाचे नियोजन विकास शेठ मित्र मंडळ व सिद्धेश् शेठ युवा मंच यांच्या वतीने नियोजन पद्धतीने करण्यात आले


