# समाजसेवक सुदेश उतेकर यांच्या वतीने तीन शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप – कोकण न्यूज मराठी
आरोग्य व शिक्षण

समाजसेवक सुदेश उतेकर यांच्या वतीने तीन शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

पोलादपूर, संदीप जाबडे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने समाजसेवक सुदेश उतेकर यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल तुर्भे, प्राथमिक शाळा दिविल आणि प्राथमिक शाळा तुर्भे खुर्द येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ वह्या, कंपास व खाऊ वाटप करण्यात आला.

विशेष म्हणजे, समाजसेवक सुदेश उतेकर हे मागील पाच वर्षांपासून सातत्याने शालेय साहित्य वाटप, शेतकऱ्यांना खत वाटप तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे समाजसेवा करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे हे त्यांचे कार्य परिसरात कौतुकास्पद मानले जात आहे.

 

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणास्थान  पोलादपूर तालुक्याचे भूमिपुत्र कॅबिनेट मंत्री दर्जा नामदार प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सामाजिक, शैक्षणिक व विद्यार्थीहिताच्या उपक्रमांना भविष्यातही प्राधान्य देत सहकार्य सुरू ठेवण्याची ग्वाही समाजसेवक सुदेश उतेकर यांनी दिली.

या प्रसंगी तुर्भे बुद्रुकचे सरपंच गोविंद उतेकर, उपसरपंच राजेश उतेकर, दिविलचे सरपंच सागर देवे, सहदेव उतेकर, उषा उतेकर, गणेश उतेकर, शैलेश मोरे, नामदेव भिलारे यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त करत समाजसेवक सुदेश उतेकर व सर्व आयोजकांचे आभार मानले. तसेच विद्यालयांच्या वतीनेही या स्तुत्य उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक साहित्याच्या वाटपामुळे अनेक विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची सकारात्मक आणि उत्साहवर्धक सुरुवात करण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!