कापडे बुद्रुक डोंबेश्वरवाडी येथे सिमेंट काँक्रीट अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील डोंबेश्वरवाडी येथील अंतर्गत रस्त्याची मागील काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. डोंबेश्वरवाडी येथील ग्रामस्थांनी माजी तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, मंडळ अध्यक्ष वैभव चांदे, संदीप चव्हाण, योगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने नामदार प्रविण दरेकर यांच्याकडे या रस्त्याची व्यथा मांडून रस्त्यासाठी निधीची मागणी केली. नामदार प्रविण दरेकर यांनी सदरील रस्त्याच्या कामासाठी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असून त्यास मंजुरी मिळाली आहे. या सिमेंट काँक्रीट अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन संपन्न ०५ जानेवारी २०२६ रोजी भारतीय जनता पार्टीचे तालुका मंडळ अध्यक्ष वैभव चांदे, माजी अध्यक्ष रायगड बँक संचालक प्रसन्न पालांडे, आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे ग्रामीण अध्यक्ष हरी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या भूमिपूजन सोहळ्याला शहर अध्यक्ष महेश निकम, कोषाध्यक्ष राजेश सकपाळ,आपली माती आपली माणसं संस्थेचे सरचिटणीस संदीप चव्हाण,तालुका चिटणीस आशुतोष दरेकर, माजी अध्यक्ष तुकाराम केसरकर, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, मा. उप सरपंच राजेश कदम, गणेश मालुसरे, पांडुरंग सोंडकर,ज्येष्ठ नेते नामदेव शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डोंबेश्वरवाडी ग्रामस्थांनी पोलादपूरचे सुपुत्र नामदार प्रविण दरेकर यांचे आभार मानले असून उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.



