# पोलादपूरमध्ये भाजपाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध – कोकण न्यूज मराठी
महाराष्ट्रराजकीय

पोलादपूरमध्ये भाजपाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध

पोलादपूर, संदीप जाबडे

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतान यांच्यासोबत केल्याप्रकरणी राज्यात सर्वत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध केला जात असताना पोलादपूर भाजपाचे तालुकाध्यक्ष वैभव चांदे यांच्या नेतृत्वाखाली सपकाळ यांची चित्रं जाळून छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासमोरे निषेध करण्यात आला. .

दोन दिवसांपूर्वी टीपू सुलतान याला शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती टीपू सुलतान यांनी छत्रपतींचा आदर्श ठेवून इंग्रजांविरूध्द लढण्याची भूमिका घेतल्याचे यावेळी सपकाळ यांनी सांगितले होते. यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्षेप घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध केला.

पोलादपूर तालुका भाजपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयासमोर तालुकाअध्यक्ष वैभव चांदे, राजेश सकपाळ, महेश निकम, प्रमोद चव्हाण, आशुतोष दरेकर, सपना बुटाला, गणेश शेठ, मनोज पवार आणि संचिता चांदे यांनी भाजपा महिला आघाडी जिल्हाउपाध्यक्ष तनुजा भागवत यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!