शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धाचे महाड येथे आयोजन

महाड प्रतिनिधी, मितेश नवले
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक व अधिकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे राज्यातील राज्य मंडळाच्या असणाऱ्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित, अंशतः अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षन यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक प्रशासकीय कौशल्यवर्धित करणे त्यांच्या समन्वय, सहकार्य, स्पर्धात्मक भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्याचा चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात येत आहे.
त्या स्पर्धेचे आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आले असून सदर स्पर्धे ४२ विषयावर आधारित असणार आहेत त्याचबरोबर आठ क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे नमूद स्पर्धेचे निकष व नियमावली याबाबत सविस्तर माहिती शिक्षक व अधिकारी कर्मचाऱ्या स्पर्धा मार्गदर्शक या पुस्तके देण्यात आलेली आहेत शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी मार्गदर्शक सूचनाचे काळजीपूर्वक अवलोकन करावे अशा पद्धतीची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने सदर पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सदर स्पर्धेमध्ये क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा, हायकोथोन स्पर्धा, शाळांमधील विविध क्लब सादरीकरण स्पर्धा, विज्ञान व गणिताचा जादूगार, बाल मानसशास्त्र स्पर्धा व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन स्पर्धा, व्यक्ती अभ्यास स्पर्धा, एम एस वर्ल्ड व एम एस एक्सेल स्पर्धा, पीपीटी स्पर्धा, ॲनिमेशन सादरीकरण, स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत वाद्य व वादन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, नाट्य नाटक भूमिका अभिनय मूक अभिनय स्पर्धा, योगासन स्पर्धा, सुगम गायन स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धा, पोस्टर बनवणे, प्रवास वर्णन लेखन स्पर्धा, कथा लेखन स्पर्धा, शोधनिबंधक, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, डॉक्युमेंटरी आत्मचरित्र लेखन, मानसिक क्षमता व माहिती विश्लेषण, सुलेखन, सुडको शब्दकोडे, प्रश्नमंजुषा, समसपूर्वक वाचन, परकीय भाषा बोर्ड स्पर्धा, मराठी ओलंपियाड,गणित ऑलिंपियाड, इंग्रजी ऑलिंपियाड, विज्ञान ओलंपियाड, सामाजिक क्षेत्र, ओलिंपिक बुद्धिमत्ता चाचणी, अशा विविध स्पर्धेचे आयोजन *महाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री राजन सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये शुक्रवार ७ नोव्हेबर २०२५ रोजी अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन करण्यात आले असून सदर स्पर्धेसाठी लागणारे पंच व इतर सर्व सुविधा महाड पंचायत समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेमध्ये महाड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन सदर स्पर्धा यशस्वी करावी तसेच प्लास्टिक मुक्त परिसर ही संकल्पना आपण सर्वांनी अनुसरावी असे आवाहन महाड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे यांनी केले आहे.
