पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावठाण येथे शेकापला खिंडार, शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
महादेव मंदिर सभामंडप व अंतर्गत रस्त्यांचे भूमीपूजन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावठाण येथे शिवसेनेच्या वतीने भव्य पक्षप्रवेश व विकासकामांचा भूमीपूजन सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विकासात्मक कार्याने प्रेरित होऊन अनेक ग्रामस्थांनी शेकाप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.मोरगिरी गावठाण येथे शेकापशी अनेक वर्षे एकनिष्ठ राहूनही विकासापासून वंचित राहिलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी महादेव मंदिराचा जिर्णोद्धार, सभामंडप तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
नामदार भरत गोगावले यांचे मोरगिरी गावठाण येथे खालुबाच्या ठेक्यावरून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढून सभास्थळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पक्षप्रवेशाचा भव्य व दिव्य कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशामध्ये प्रमुख कार्यकर्ते सहदेव जाधव, दत्ताराम बामणे, काशीराम रांगडे, भागोजी पदरथ, सखाराम पदरथ, तुकाराम पवार, सखाराम पवार, महादेव जाधव, दगडू जाधव, चंद्रकांत पदरथ, हरिश्चंद्र पवार, पांडुरंग पवार, विठ्ठल पवार, बंटी पवार, प्रशांत पवार, मनोहर पवार, गोपाळ पवार, कैलास पवार, सुशांत पदरथ, विनोद पदरथ यांच्यासह मुंबई–पुणे–बडोदा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे नामदार भरत गोगावले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिवसेनेत सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास सहसंपर्कप्रमुख व माजी जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, उपतालुकाप्रमुख सतीश शिंदे, सुरेंद्र बांदल, शहरप्रमुख सुरेश पवार, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, युवासेना संपर्कप्रमुख विजय शेलार, माजी उपसभापती शैलेश सलागरे, नरेश सलागरे, दशरथ उतेकर, दत्ताराम मोरे, स्वप्निल चोरगे, श्रीराम गायकवाड, अविनाश शिंदे, सरपंच विकास नलावडे, शौकत तालेकर, जगदीश महाडिक, सुयोग शिंदे, जनार्दन कदम, नितीन दळवी, प्रकाश शिंदे, संदीप शिंदे, प्रसाद मोरे, तानाजी निकम, अनिल दळवी, अनिल भिलारे, रामदास कळंबे, प्रकाश कदम, डॉ. निलेश कुंभार, निलेश कंक, विजय मोरे, गीता दळवी, रामचंद्र ढवळे, प्रसाद साने यांच्यासह असंख्य शिवसैनिक, युवासैनिक व संपूर्ण महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांनी एकमुखाने जाहीर केले की, यापुढे संपूर्ण मोरगिरी गावठाण शिवसेनेच्या बाजूने एकनिष्ठ राहील व येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा असेल.
नामदार भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मोरगिरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा नक्कीच फडकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत कळंबे यांनी मोरगिरी गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. उपतालुकाप्रमुख सतीश शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मोरगिरी गावातील कोट्यवधींची विकासकामे नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाली असून भविष्यातही प्रत्येक वाडी-वस्तीतील विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण केली जातील.
कार्यक्रमादरम्यान संपूर्ण मोरगिरी गावठाण भगव्या झेंड्यांनी व घोषणांनी दुमदुमून गेले होते. रस्ते, परिसर व वातावरणात ‘भगव्या वादळा’चे चित्र पाहायला मिळाले.



