धारवली पंचक्रोशीत शिवसेना शेकापचा घरोघरी प्रचार, मोठया फरकाने विजयाचा विश्वास

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार डॉ निलेश काशिनाथ कुंभार व माटवण पंचायत समिती गणाच्या शेकापच्या उमेदवार साक्षी कांबळेकर यांच्या प्रचारार्थ युतीच्या कार्यकर्त्यांनी धारवली पंचक्रोशीत घरोघरी प्रचार केला. या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते या प्रचार रॅलीत सहभागी होताना पाहायला मिळाले. धारवली पंचक्रोशीत आतापर्यंत एकमेकांविरोधात लढलेल्या शिवसेना आणि शेकापने युती केल्याने कापडे बुद्रुक जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉ. निलेश कुंभार व माटवण पंचायत समितीचे उमेदवार साक्षी कांबळेकर यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल अशी चर्चा घराघरात पाहायला मिळत आहे. शिवसेनेने शेतकरी कामगार पक्षाला माटवण पंचायत समिती गणाची जागा सोडल्याने शेकापचे विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावलेंचे आभार व्यक्त केले आहे.



