आपला जिल्हा
समाजसेवक सुदेश उतेकर यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ

- रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासूनच पोलादपूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी संघटना बळकट करण्यासाठी पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु केला आहे. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावचे समाजसेवक सुदेश उतेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी नरिमन पॉईंट, मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात जाहीर पक्ष प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेना पोलादपूर तालुका समन्वयक सुदेश उतेकर, शिवसेना लोहारे उपविभाग प्रमुख तुर्भे उपसरपंच राजेश उतेकर, शिवसेना रायगड जिल्हा संघटक आनंद पवार, लोहारे विभाग युवासेना प्रमुख गणेश पवार, सुहास उतेकर, आदेश उतेकर, ऋतिक उतेकर, साहिल उतेकर, वैष्णव सोनाते आदिंनी यावेळी पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे पोलादपूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला बळ मिळणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टी पोलादपूर तालुक्यात किती जागा लढते याकडे संपूर्ण पोलादपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.



