अखिल प्राथमिक शिक्षक संघ पोलादपूर यांच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

पोलादपूर, संदीप जाबडे
७ जानेवारी शिक्षक वर्धापन दिनाचे औचित्य साधून जनरल कौन्सिल सदस्य तथा रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान चांदे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल शिक्षक संघ पोलादपूर यांच्या वतीने पोलादपूर मधील ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उठवला आहे अशा तालुक्यातील चौदा गुणवंत शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलादपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये संदेश वायंगणकर शाळा-धामणदिवी, सतिश शिंदे शाळा-पळचिल, नौशाद नाडकर शाळा-वावे उर्दू, राहुल खामगळ शाळा-हावरे, पोपट काळे शाळा-रानवडी बु।।,संदीप जाधव शाळा-पायटेवाडी, अमर जाधव शाळा-चाळीचाकोंड, राजू पार्टे शाळा-मोरगिरी, रामेश्वर चट शाळा-ढवळे, विक्रम पार्टे शाळा-देवळेगाव, दीपक मोहिते शाळा-गवळ्याचा कोंड, सचिन चौधरी शाळा-वडघर ,सविता मोरे शाळा-गोळेगणी, अश्विनी कोळेकर शाळा-लोहारे या शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.
त्यानंतर शिक्षक व अधिकारी क्रीडा स्पर्धेत ज्यांनी जिल्हा व विभाग स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा वीस शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अखिल क्रीडा महोत्सव आयोजित हॉलीबॉल स्पर्धेत विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या संघाना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित संघप्रेमींना श्री.दीपक कुर्डुनकर यांनी संघाचा इतिहास व कार्य याविषयी मार्गदर्शन केले तर श्री.परशुराम मोरे यांनी संघटना व केलेली कामे, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याची माहिती सांगितली. पेण पतपेढी व्हा.चेअरमन श्री.दत्ताराम शिर्के यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून संघटना वाढीसाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करुया असे सांगितले. शेवटी जिल्हा अध्यक्ष श्री सोपन चांदे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की पुरस्कार ही एक ट्रॉफी नसून ती आपल्या उत्कृष्ट कामाची पोचपावती आहे .संघटना असे चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी नेहमीच उभी राहिली आहे;तसेच जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे शिक्षकाचे काम आडणार नाही असे सांगितले. शेवटी दोंदे कुटुंबाने शिक्षकांसाठी केलेल्या कामाची माहिती सर्वांना सांगितली. कार्यक्रमासाठी राज्य सदस्या ज्योती कुर्डुनकर, माणगांव तालुका आजी-माजी अध्यक्ष ,केंद्रप्रमुख व बहुसंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परशुराम मोरे, सिताराम जाधव, तालुका अध्यक्ष. सचिन दरेकर, महादेव मदने, सचिव नवनाथ साठे, प्राजक्ता मोरे, रुपाली जाधव यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन दरेकर,सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर तर आभार प्रदीप वरणकर यांनी केले.



