गोळेगणी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर येथे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईवर मात करणेसाठी सर्व ग्रामस्थानी एकत्र येऊन पंधरा मीटर लांबीचा वनराई बांधरा बांधन्यात आला या बांधाऱ्याचा उपयोग गावची पिण्याच्या पाण्याची विहीरीची पाणी पातळी वाढण्यास होणार आहे तसेच गावातील गुरे जनावरांसाठी पाण्याची सोय होणार आहे. आणि गावातील महिला कपडे धुवण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहेत तसेच या बंधाऱ्याच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या बागाना पाणी उपलब्ध होणार आहे. हा बंधारा बांधण्यासाठी कृषि विभागाचे मार्गदर्शन लाभले तसेच ग्राम पंचायत अधिकारी यांचे सहकार्य लाभले बांधरा बांधतेवेळी सरपंच प्रकाश दळवी,तालुका कृषि अधिकारी सुनील घनवट उपकृषी अधिकारी श्रीरंग मोरे, सहाय्यक कृषि अधिकारी दादासो खारतोडे, ग्राम पंचायत अधिकारी संतोष मोरे, मा. उपसरपंच ज्ञानेश्वर मोरे,शेखर येरुणकर,दिपक सुर्वे, जननी रामेश्वर गटाचे अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रभाकर पवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
