# खैराची अवैध वाहतूक करणारा ट्रक सह खैर जप्त  – कोकण न्यूज मराठी
क्राईम स्टोरीमहाराष्ट्र

खैराची अवैध वाहतूक करणारा ट्रक सह खैर जप्त 

महाड वन विभागाचे पोलादपूरच्या वेशीवर कारवाई

पोलादपूर, संदीप जाबडे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर जवळ वनविभागाच्या पथकाने सापळा रचून गुजरात राज्यातून चिपळूणकडे होणारी अवैध खैराची तस्करी रोखली आहे. या कारवाईत अवैध खैराचा साठा असलेला ट्रक आणि त्याला रस्ता दाखवणारा दुचाकीस्वार अशा दोघांना पकडण्यात वनविभागाच्या महाड पथकाला यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरुन एम एच -१२-ई क्यू-९८६६ क्रमांकाचा ट्रक संशयास्पद रित्या जात असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या ट्रकच्या पुढे त्याला रस्ता दाखवण्यासाठी एम एच -०३-डी क्यू -६१०९ क्रमांकाची यामाहा एफ झेड मोटारसायकल पथदर्शक म्हणून चालत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. वनविभागाने तत्काळ कारवाई करत मोहम्मद अरसद (राहणार गुलशन नगर, जिल्हा बलसाड, गुजरात) आणि मोहम्मद उस्मान नृद्दिन खान (राहणार मुलुंड कॉलनी, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत खैर वृक्षाचे २०१ तुकडे जप्त करण्यात आले असून त्याचे मोजमाप अंदाजे ४.५७३ घनमीटर आहे. जप्त केलेल्या या मालाची बाजारभावाप्रमाणे किंमत ७,०१,८६६ रुपये इतकी असून यासह ट्रक व दुचाकी ही दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६(१), ४१, ४२ आणि ६५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना महाड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

ही यशस्वी मोहीम उपवन संरक्षक रोहा व सहाय्यक संरक्षक (जकास व कॅम्प) रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आशिष पाटील, पोलादपूरचे वनपाल आणि पोलादपूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!