जुनी पेन्शन टीईटी रद्दसाठी ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मूक मोर्चा !

जुनी पेन्शन टीईटी रद्दसाठी ९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मूक मोर्चा !
24 नोव्हेंबर रोजी जंतर मंतर येथे धरणे आंदोलन !!
पोलादपूर संदिप जाबडे
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करणे आणि जुनी पेन्शन बंद करण्या विरोधात 9 नोव्हेंबर रोजी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे तर 24 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीत जंतर मंतर येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात लाखो शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ तथा जिल्हाध्यक्ष मध्यवर्ती शिक्षक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान चांदे यांनी दिली आहे.
या आंदोलनामध्ये प्रामुख्याने टीईटी परीक्षा रद्द करावी आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी या दोनच मागण्या असणार आहेत सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी पाच वर्षांपूर्वी जास्त सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे या निर्णयावर फेरविचार व्हावा यासाठी संघटनेने 25 सप्टेंबर रोजी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे याची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे
शासनाने न्यायालयासमोर शिक्षकांच्या बाजूने आपले म्हणणे मांडावे यासाठी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे जर 24 नोव्हेंबरच्या आंदोलनाने टीईटीचा फेरविचार झाला नाही तर फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात संसद भवनाला घेराव घालून जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ तथा जिल्हाध्यक्ष मध्यवर्ती शिक्षक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान चांदे यांनी केले आहे.


