# ७७व्या प्रजासत्ताक दिनी अलिबाग येथे मंत्री गोगावलेंच्या हस्ते ध्वजरोहण – कोकण न्यूज मराठी
महाराष्ट्र

७७व्या प्रजासत्ताक दिनी अलिबाग येथे मंत्री गोगावलेंच्या हस्ते ध्वजरोहण

महाड, प्रतिनिधी

७७ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त अलिबाग येथील पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ७७ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त अलिबाग येथील पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या मुख्य शासकीय समारंभात पोलीस दलाने अत्यंत शिस्तबद्ध संचलन करून दिलेली मानवंदना अभिमानाने स्वीकारली.

तसेच रायगड जिल्ह्याच्या शासकीय ध्वजारोहणाचा मान मला मिळाला, ही माझ्यासाठी अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे. ही संधी दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक, आणीबाणी सत्याग्रही, सर्व मान्यवर, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार बंधू-भगिनी व तमाम रायगडवासियांना मनापासून शुभेच्छा. देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यभूमीत संविधानिक मूल्यांचे पालन करत, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा जपत रायगड जिल्ह्याच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्य करू, अशी प्रतिज्ञा करतो.

यावेळी प्रशासनातील शौर्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना, तसेच प्रशासकीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे सत्कार आणि सन्मान जिल्हाधिकारी किशन जावळेजी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले , जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल व माझ्या हस्ते केला गेला.या सोहळ्यात शिवसेनेचे आमदार महेंद्रजी दळवी,आणि प्रशासनातील सर्व सहकारी अधिकारी-कर्मचारी. उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!