तुका म्हणे तुझा न पडावा विसर!
ह. भ. प. नित्यानंद महाराज मांडवकर यांचे लोकतेने स्वर्गीय भाई साहेब पाशिलकर यांच्या तेराव्याची कीर्तन सेवा

रोहा : रुपेश रटाटे
रोहा तालुक्यासह, जिल्ह्याच्या राजकारणतील विकासाचा महामेरू,प्रशसकीय कामकाजावर मजबूत पक्कड, सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे राजकणातील भीष्म पितामह या रोहा तालुक्याने गमावला.दिनांक २६ फेब्रुवारी त्याच्या राहत्या घरी तेरावे करण्यात आले होते. मरावे पण मागे कीर्ती रुपे उरावे! अशी कार्य असलेले व्यक्ती म्हूणन आज भाईची ओळख संबध रायगड जिल्ह्यात राहिली आहे. विविध पक्षाचे मुख्य नेते, व्यावसायिक कारखानदारीतील अनेक उद्योजक, सर्वसामान्य कार्यकर्ते, सामान्य जनता गेली १३ दिवस पाशिलकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देत आहेत. १९६२ साली राजकीय कारकीर्दला सुरुवात केली ती २०१६ पर्यंत अविरत चालू ठेवली. वयाची ५० हुन अधिक वर्ष त्यांनी लोकसेवेसाठी अर्पण केलेला नेता मिळणं खूप भाग्यचं आहे.राजकीय कारकिर्दीत अनेक पदांचा कार्यभार त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला होता. कीर्तनरूपी सेवेतून ह. भ. प. नित्यानंद महाराज मांडवकर यांनी अनेक खूप सुंदर ओवी आणि उदाहरणे देखील सांगितले.
पहा ते पांडव वनवासी!परी त्या देवासि आठवीति!
प्रल्हादासी पिता करितो जाचणी | परी तो स्मरे मनी नारायण!
सुदामा ब्राह्मण दारिद्रे पिढीला |नाही विसरला पांडुरंगा!
तुका म्हणे तुजा न पडावा विसर |
दुःखाचे डोंगर झाले तरी!
ह. भ. प नित्यानंद महाराज मांडवकर यांच्या किर्तन रुपी सेवेतून भाईच्या अनेक कार्याची तंतोतंत उदाहरणे सांगितली.राजकीय कार्याला उजाळा देत तरुणाई सह अनेक कार्यकर्ते, नेतेवाईक, सगेसोयरे याचे डोळे पाणावले. अविरत कार्य ठेवणे, सतत जनसंपर्क किती महत्वाचे आहे हे देखील नमूद केले.महाराजांनी पूढे स्वतःच्या जीवनतील प्रसंग देखील या वेळी उपस्थिताना सांगितलं की, मी देखील माझ्या जीवनात एक प्रसंगात तीन ते चार दिवस जिल्हा परिषद मध्ये फेऱ्या मारत असताना भाई मला भेटले मायेने जवळ घेतले. मला आपुलकीने चहा विचारला मी चहा घेत नसताना देखील मी घेतला. जो काम मी गेली तीन दिवस फेऱ्या मारत होतो तो काम भाई नी केवळ तीन मिनिटात पूर्ण केला. अशी अनेक उदाहरणे श्रद्धांजलीच्या वेळी प्रत्येक श्रोत्यांनी व्यक्त केली.भाई नंतर विनोद पाशिलकर देखील समाजकार्य, लोकहितासाठी नेहमीच कार्यतत्पर असतात त्यांनी देखील राजकीय बाळकडू असंच अविरत पूढे घेऊन जावे धाटाव गावाला लाभलेले दोन अनमोल हिरे म्हणजे स्वर्गीय भाई साहेब पाशिलकर,वैकुंठवासी ह. भ. प पुरुषोत्तम महाराज पाटील ( बापू ) या दोन महापुरुषांनी गावाचं नाव महाराष्ट्रच्या पटलावर कोरले आहे. त्या मुळे आत्ता पुन्हा भाई होणे नाही, असंच काही प्रत्येकाच्या वाणीतून येते होते.



