# रोहेकरांनी केले डॉ. सी. डी. देशमुखांच्या  कार्यावर विचारमंथन – कोकण न्यूज मराठी
सामाजिक

रोहेकरांनी केले डॉ. सी. डी. देशमुखांच्या  कार्यावर विचारमंथन

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवकांनी मांडली परखड मते

रोहा : देशाचे केंद्रीय अर्थमंत्री व रोह्याचे सुपुत्र स्व. डॉ. सी. डी. तथा चिंतामणराव देशमुख यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त रोहा येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत युवकांनी विविध विषयांवर परखड मतप्रदर्शन केले. रोहा प्रेस क्लब व तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील राम मारुती चौक येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडली.

 

“अगर जिंदा है… तो जिंदा नजर आना जरूरी है…” या आशयातून युवकांच्या मनातील विचार जाणून घेण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक व समकालीन विषयांवर युवकांनी निर्भीडपणे आपली मते मांडत उपस्थितांची दाद मिळवली.

 

स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली.

वरिष्ठ गटामध्ये प्रथम क्रमांक भरत देवराम चौधरी रोहा, द्वितीय आदिती अनिल वाटवे सी.के.टी. कॉलेज, तृतीय सायली प्रज्वल बापट यांनी पटकावला, तर श्रवण वामन कदम कोलाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

 

कनिष्ठ गटामध्ये प्रथम विश्व जनार्दन उभारे कोएसो मेहेंदळे, रोहा, द्वितीय तनिष्क सतेज आपणकर जे. एम. राठी स्कूल, तृतीय आस्था विनोद थिटे श्रमिक विद्यालय, चिल्हे तर अंतरा रूपेश शिंदे के.ई.एस., रोहा हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.

 

या स्पर्धेचे तुळशीदास मोकल व अमित गुजर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धा प्रमुख म्हणून रोशन चाफेकर, नंदकुमार मरवडे, रविंद्र कान्हेकर, शशिकांत मोरे यांनी संयोजनाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहयाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा वनश्री शेडगे, ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, नगरसेविका स्नेहा अंबरे, स्पर्धा प्रमुख आणि नवनिर्वाचित् नगरसेवक रोशन चाफेकर, रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचा सन्मान करण्यात आला

 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण रोहा अष्टमी नगरपरिषद नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

या स्पर्धेच्या आयोजनात सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान, मावळा प्रतिष्ठान, राजमुद्रा फाउंडेशन, रोट्रॅक्ट क्लब, अभिनव रोहा, रोटरी क्लब रोहा, श्रीकृपा फाउंडेशन, स्पंदन नाट्य संस्था, शिवचरण मित्रमंडळ, मॉर्निंग क्लब रोहा, शिवशंभु प्रतिष्ठान रोहा, रोहा युवा आदी संस्थांनी परिश्रम घेतले.

 

देशाचे भविष्य असलेल्या युवा शक्तीला व्यासपीठ मिळावे, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत, हा उद्देश या स्पर्धेतून सफल झाल्याचे मान्यवर तसेच उपस्थितांनी नमूद केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!