# रायगड जिल्हा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती पोलादपूर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळावा मार्गदर्शन शिबिर उत्साहात  – कोकण न्यूज मराठी
कृषी

रायगड जिल्हा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती पोलादपूर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळावा मार्गदर्शन शिबिर उत्साहात 

पोलादपूर, संदीप जाबडे

रायगड जिल्हा परिषद अलिबाग आणि पंचायत समिती पोलादपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर येथे तालुकास्तरीय कृषी मेळावा व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. शेतकरी हा देशाचा कना असून शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते त्यासाठीच भव्य शिबीर पोलादपूर येथे घेण्यात आले.यावेळी विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राजीप सभापती चंद्रकांत कळंबे यांनी मार्गदर्शन सांगितले की,पोलादपूर तालुका दुर्गम डोंगर असून सध्या पाऊस लांबणीवर गेला असून काही शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याची वेळ असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दुपार पेरणीसाठी बी बियाणे आपण उपलब्ध करून द्यावे असे सांगितले.तसेच बाजारामध्ये अनेक पदार्थ भेसळयुक्त असून सध्या कारवाई सुरू असल्याने शेतकऱ्याचा मालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे असे सांगत शेतकऱ्यांचे कौतुक केले. तसेच राजीप सभापती वैकुंठ पाटील यांनी पंचायत समितीच्या शासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले की तालुक्यातील कोणताही शेतकरी योजनांपासून वंचित राहू नये शेतकऱ्याला योग्य ते मार्गदर्शन द्यावे व विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हव्या असे सांगत शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे अशी ग्वाही दिली. सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे,पाणी फाउंडेशनचे प्रणय गोरीवले, उपकृषी अधिकारी रवींद्र गुंड,कपिल पाटील, भाजपचे मनोज भागवत,वैभव चांदे, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर यांनी केले.

शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!