# नरवीरांचे शौर्य, त्याग आणि निष्ठा ही आजच्या पिढीसाठी आदर्श : मंत्री भरत गोगावले – कोकण न्यूज मराठी
धार्मिक व आध्यात्मिक

नरवीरांचे शौर्य, त्याग आणि निष्ठा ही आजच्या पिढीसाठी आदर्श : मंत्री भरत गोगावले

प्रतिक कालगुडे 'नरवीर' पुरस्काराने सन्मानित

पोलादपूर, संदिप जाबडे

छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ असणाऱ्या उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५६ वा शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळा अत्यंत थाटात पार पडला. रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती पोलादपूर व नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाट, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता नरेंद्र देशमुख, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके, जिल्हाप्रमुख मनोज घोसाळकर, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरवीर तानाजी मालुसरे शौर्य दिन सोहळ्यानिमित्त भगव्या ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शिवशाहीर वैभव घरत यांनी सादर केलेले प्रेरणादायी पोवाडे यांनी उपस्थित शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले. “नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासारखे जीवाची पर्वा न करणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते, म्हणूनच राजे ‘छत्रपती’ झाले आणि हिंदवी स्वराज्याची भक्कम स्थापना झाली. नरवीरांचे शौर्य, त्याग आणि निष्ठा हा प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श असल्याचे मार्गदर्शन मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित शिवभक्तांना केले. नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती व चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा ‘नरवीर पुरस्कार’ महाड तालुक्याचे भूमिपुत्र प्रतीक कालगुडे यांना देण्यात आला.

 

रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य व पंचायत समितीच्या सदस्यांचा सन्मान

 

महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पोलादपूर तालुक्यातून सलग चौथ्यांदा रायगड जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले चंद्रकांत कळंबे, नाते जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आमदार पुत्र विकास गोगावले, निलेश ताठरे,मनाली काळीजकर, मन्सूर ताज, अविनाश नलावडे, डॉ. निलेश कुंभार, मंदा औकीरकर, दिनेश हरवणकर यासोबतच पंचायत समिती सदस्यांचा सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!