साने गुरुजी विद्यालयात साने गुरुजी सप्ताहाचा शुभारंभ

पोलादपूर, संदीप जाबडे
सहयोग प्रतिष्ठान संचालित साने गुरुजी विद्यालय लोहारे येथे साने गुरुजी सप्ताह २०२५ चा शुभारंभ १८ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित आंतरवर्गीय क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळा तालुका क्रीडा समन्वयक दीपक सपकाळ यांच्या शुभहस्ते व निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मुंबई राजेंद्र पांडुरंग मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सहयोग प्रतिष्ठनचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण यांनी भुषविले. कार्यक्रमास सहयोगचे कोषाध्यक्ष सुखदेव मोरे, सहकार्यवाहक सुभाष ढाणे, सदस्य ॲड. विनय हाटे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधवी देशमुख, क्रिडा प्रमुख रुपेश झाडाणे व सर्व सेवक वृंद उपस्थित होते.

उद्घाटक दिपक सकपाळ यांनी खेळाचे जीवनातील महत्व आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.साने गुरुजी विद्यालय लोहारे आयोजित क्रिडा महोत्सवासाठी ५००० रुपयाची देणगी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाचे क्रिडा प्रमुख रुपेश झाडणे यांनी केले.



