जय हनुमान चषकाचा श्री काळभैरवनाथ सावंतकोंड संघ विजेता तर आणि अनिकेत भाऊ इलेव्हन उंबरकोंड संघ उपविजेता
निखिल सकपाळ मालिकावीर,योगेश सावंत उत्कृष्ट फलंदाज तर सागर उत्कृष्ट गोलंदाज

पोलादपूर, संदीप जाबडे
सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत जय हनुमान मित्र मंडळ मोरसडे आयोजित जय हनुमान चषक २०२६चे बहारदार आयोजन १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी बदलापूर येथील शिरगाव मैदानात करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या २४ संघानी सहभाग घेतला.
दोन दिवस पोलादपूर तालुक्यातील क्रीडाप्रेमीना चित्त थरारक क्रिकेट सामने पाहायला मिळाले. यामध्ये प्रथम क्रमांक श्री काळभैरवनाथ सावंतकोंड, द्वितीय क्रमांक अनिकेत भाऊ ११ उंबरकोंड पार्टेकोंड, तृतीय क्रमांक जय हनुमान ओंबळी, चतुर्थ क्रमांक छावा ११ केवनाले संघाने पटकाविला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार अनिकेत भाऊ ११ उंबरकोंड पार्टेकोंड संघाचा अष्टपैलू खेळाडू निखिल सकपाळ, उत्कृष्ट फलंदाज योगेश सावंत, उत्कृष्ट गोलंदाज जय हनुमान ओंबळी संघाचा सागर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरज पार्टे ठरला. स्पर्धेचे सूत्रसंचालन व समलोचन संदीप जाबडे, प्रशांत तांबे, विनोद खळे यांनी केले तर गुणलेखन विकास चौरसिया यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विकास उतेकर,लहु उतेकर, अशोक उतेकर, गणेश उतेकर, खजिनदार निलेश भोसले, योगेश केसरकर, चेतन उतेकर, प्रकाश उतेकर,कैलास पार्टे, सुजल उतेकर, आर्यन केसरकर यांसह मंडळाच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.



