काळवली ग्रामविकास मंडळ आयोजित अखंड हरीनाम सप्ताहानिमित्त कृष्णा कदम यांचा विशेष सत्कार
दिल्लीमध्ये मिळालेल्या पुरस्कारापेक्षाही काळवली ग्रामस्थांनी केलेला सन्मान मोठा : कृष्णा कदम

पोलादपूर, संदीप जाबडे
2020 साली मला कोरोनाची लागण झाल्यानंतर खरे आयुष्य काय ते कळाले. आयुष्यामध्ये आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही. त्यामुळेच रुग्णांची सेवा करता यावी, यासाठी मी वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. बघता बघता तेराशे सदस्य कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्षाला जोडले. माझ्या आयुष्यामध्ये एकूण ८० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच मला दिल्ली येथे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दिला जाणारा ‘अटल भूषण’ हा पुरस्कार मिळाला. परंतू दिल्लीमध्ये मिळालेल्या पुरस्कारापेक्षाही काळवली ग्रामस्थांनी केलेला सन्मान माझ्यासाठी मोठा असल्याचे कृष्णा कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले. काळवली ग्रामविकास मंडळ आयोजित अखंड हरीनाम सप्ताहात कृष्णा कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यासोबतच वैद्यकीय मदत कक्षाच्या शुभांगी महाडिक, सवाद माध्यमिक विदयालयाचे निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय उतेकर यांचा देखील सन्मान या निमित्ताने करण्यात आला.
श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या आशिर्वादाने, सदगुरु श्री अरविंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने गेली ३३ वर्षे येथे अखंड हरिनाम सप्ताहचे आयाेजन करण्यात येते. सामाजिक उपक्रमांचे आयोजन सप्ताहाच्या कालावधीत केले जाते. काकड आरती, प्रात:स्मरण, पारायण, हरिपाठ, किर्तन, हरिजागर, भारुड आदींचे यंदा करण्यात आले होते. काळवली गावच्या भक्तगणांनी या भक्ती सेवेचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाला वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा मारुती कदम , राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल मालुसरे, गोरक्षक दिपक उतकेर, नामदेव शिंदे, साईनाथ शिंदे, प्रविण महाडिक, पञकार संदिप जाबडे, पञकार नितेश शेलार, भा.ज.प युवा नेतृत्व विकास लाड, श्रीकांत भिलारे, जगदिश मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताहासाठी काळवली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अशोक जाधव, जेष्ठ पञकार राजाराम रेणाेसे, उपाध्यक्ष सतिश रेणुसे, सेक्रेटरी राकेश पार्टे, उपसेक्रेटरी रामू पवार, खजिनदार ऋषीकेश पार्टे,उपखजिनदार याेगेश पवार व मंडळातील पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.


