पोलादपूर केंद्राचा निकाल ८८.८४%, विज्ञान शाखेतून आकाश सालेकर, वाणिज्य शाखेतून हंसिका साळवी तर कला शाखेतून ढवळे प्रथम

पोलादपूर केंद्राचा निकाल ८८.८४%, विज्ञान शाखेतून कापडे विद्यालयाचा आकाश सालेकर, वाणिज्य शाखेतून विद्यामंदिर पोलादपूरची हंसिका साळवी तर कला शाखेतून कापडे विद्यालयाचा नवनाथ ढवळे प्रथम
पोलादपूर, संदीप जाबडे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ, यांचे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ०२ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून या परीक्षेमध्ये पोलादपूर केंद्राचा निकाल ८८.८४% टक्के लागला आहे. २४५ विद्यार्थी पैकी परीक्षेत २४२ विद्यार्थी पात्र ठरले होते या पैकी २१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर परीक्षेचा निकाल ८५.९८% इतका लागला आहे. या परीक्षेसाठी १५७ विद्यार्थी परीक्षास प्रविष्ट झाले होते.
कला शाखेत ५८ विद्यार्थी परीक्षेत बसले होते पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, वाणिज्य शाखेत ५३ विद्यार्थी परिषद प्रविष्ट झाले होते पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, विज्ञान शाखेत ४६ विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले असून पैकी ४१ उत्तीर्ण झाले आहेत. एकूण विद्यामंदिर पोलादपूरचा निकाल ८५.९८ % इतका जाहीर झाला असून याबाबत विद्यामंदिरचे शाळा समिती अध्यक्ष निवास शेठ,प्राचार्य श्री साळुंखे सर, कॉलेजचे विभाग श्री ढगे सर, पोलादपूर तालुक्यातील शिक्षण प्रेमी नागरिक, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन व कौतुक केले आहे.
रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री वरदायनी माध्यमिक व महाविद्यालय चा निकाल ९४.११% टक्के लागला आहे. या विद्यालयातून ८५ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले होते त्यापैकी ८० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या पैकी विज्ञान विषयात ३० विद्यार्थी पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर कला शाखेत १८ पैकी १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेमध्ये ३७ विद्यार्थी परीक्षेत बसले होते या पैकी ३५ विद्यार्थी यशस्वी झाले असून शाळेचा निकाल ९४.११% लागला आहे.
विज्ञान शाखेतून श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडेचा आकाश संतोष सालेकर (७१.००%) तालुक्यात प्रथम, वाणिज्य शाखेतून विद्यामंदिर पोलादपूरची हंसिका मनोज साळवी(७६.६७%)तालुक्यात प्रथम, कला शाखेतून श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडेचा नवनाथ लक्ष्मण ढवळे (६९.६७. ००%) गुण मिळवीत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे.श्री वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापडेच्या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे l.



