# युथ क्लब महाड आयोजित रायगड प्रदक्षिणेत ८०० पेक्षा अधिक प्रदक्षिणार्थींचा सहभाग, युथ क्लबच्या नियोजनाचे कौतुक – कोकण न्यूज मराठी
महाराष्ट्र

युथ क्लब महाड आयोजित रायगड प्रदक्षिणेत ८०० पेक्षा अधिक प्रदक्षिणार्थींचा सहभाग, युथ क्लबच्या नियोजनाचे कौतुक

महाड, संदीप जाबडे

युथ क्लब महाड आयोजित रायगड किल्ला प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात शिवजयघोषात आणि अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. २८ डिसेंबर २०२५ रोजी युथ क्लब, महाड तर्फे आयोजित या प्रदक्षिणेमध्ये ८०० पेक्षा अधिक प्रदक्षिणार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या रायगड किल्ल्याभोवती दरवर्षी श्रद्धा, सामाजिक एकोपा, साहस आणि शिवरायांप्रती असलेल्या आदरभावनेतून ही प्रदक्षिणा आयोजित केली जाते. युथ क्लबचा हा सलग ३४ वा वर्षांचा उपक्रम असून यावर्षीही परंपरेनुसार क्लबच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत या उपक्रमाचे काटेकोर नियोजन केले होते.

 

प्रदक्षिणेदरम्यान तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण प्रदक्षिणा खेळीमेळीच्या, कौटुंबिक आणि तरीही अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. आयोजकांनी शिस्त, स्वच्छता आणि सुरक्षिततेला विशेष प्राधान्य दिले होते. प्रदक्षिणा मार्गावर युथ क्लबच्या स्वयंसेवकांनी मार्गदर्शन व देखरेखीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. सहभागींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचार, विश्रांती व्यवस्था तसेच आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता ही प्रदक्षिणा शांततेत पार पडली.

 

या उपक्रमामुळे सामाजिक ऐक्य, परंपरेचे जतन आणि तरुणाईची सकारात्मक ऊर्जा अधोरेखित झाली. परंपरा जपत समाजोपयोगी कार्य करण्याचा आदर्श युथ क्लबच्या माध्यमातून उभा राहिला असून, अनेक मान्यवर व सहभागी नागरिकांनी या आयोजनाचे विशेष कौतुक केले.

 

ही प्रदक्षिणा यशस्वी होण्यासाठी युथ क्लब अध्यक्ष श्री. राजेश बुटाला, कार्यक्रम प्रमुख श्री. संतोष उर्फ बाळा सकपाळ, तसेच दिलीप धारप, दीपा धारप, मकरंद जोशी, अशोक तलाठी, संजय माळवदे, चंद्रकांत उर्फ सी. डी. देशमुख, अभय पिंगळे, महेश इब्रामपूरकर, श्री. पराशर, उदय मेहता, साईराज सुर्वे, अजय, निखिल भोसले, प्रणित गांधी, बिपीन वडगांवकर, अमित गाडगीळ, रवी वैद्य, राजू सासणे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी सहपरिवार परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले. युथ क्लबच्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करताना आयोजकांनी पुढील वर्षीही रायगड प्रदक्षिणा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!