मौजे कापडे खुर्द चोरगेवाडी येथील नदीवरील साकव बांधकामाचा मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते शुभारंभ

पोलादपूर, संदीप जाबडे
पोलादपूर तालुका, कापडे विभागातील मौजे कापडे खुर्द येथील चोरगेवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या साकवाच्या कामाचा शुभारंभ ना रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या समवेत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
चोरगेवाडी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची ही महत्त्वाची मागणी होती. प्रतापगडाच्या पायथ्यापासून येणाऱ्या नदीला पावसाळ्यात पूर आल्यावर गावातील दळणवळण पूर्णपणे खंडित होत असे. साकवाच्या बांधकामामुळे आता सुरक्षित व सुलभदळणवळण उपलब्ध होणार असून, विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
या प्रसंगी मंत्री भरत गोगावले, सह संपर्कप्रमुख माजी जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार,विभाग प्रमुख तानाजी निकम, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, युवासेना संपर्कप्रमुख विजय शेलार, उप विभाग प्रमुख पांडुरंग वरे, सरपंच संदीप काळे, माजी उपसभापती शैलेश सलागरे, उप सरपंच सोपान निकम,शेतकरी सेनेचे नारायण साने, बांधकाम कामगार सेनेचे राजेश डांगे, नरेश सलागरे, विकास नलावडे, प्रसाद साने यांच्यासह असंख्य शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते. यावेळी बोलताना तालुक्यातील विकास कामांना गती देण्याचे काम केले गेले असल्याचे सांगत तालुक्यातील विकास कामे माझ्या कार्यकाळात झाली आहेत आजही पोलादपूर तालुका माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे आणि तो भविष्यात सुद्धा उभा राहील असा विश्वास ना गोगावले यांनी व्यक्त केला.



