ओमकार मित्र मंडळातर्फे ओमकार चषकाच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन
रतनबुवा क्रीडा नगरी डोंबिवली येथे रंगणार थरार

मुंबई, प्रतिनिधी
ओमकार मित्र मंडळ दातिवली दिवा यांसतर्फे रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रतनबुवा क्रीडा नगरी डोंबिवली येथे करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेमध्ये रत्नागिरी विभागातील आठ संघ व पोलादपूर तालुक्यातील कापडे विभागातील आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३१,०००रु. व आकर्षक, द्वितीय पारितोषिक १७,००० व आकर्षक ठेवण्यात आले आहे. यासोबतच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी कुलर चषक व मेडल, उत्कृष्ट गोलंदाज चषक व मेडल, उत्कृष्ट फलंदाज चषक व मेडल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक व मेडल अशी वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहे. ओमकार चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे सर्व सामने युट्युब वाहिनीवर लाईव्ह पाहता येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी शैलेश कदम रत्नागिरी विभाग (+९१ ९२७३४६४१०४), विजय तळेकर कापडे विभाग ((+९१ ८८५०१९५७४१) यांच्याकडे संपर्क साधायचा आहे.



