‘श्री समर्थ जॉब कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा’ प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

‘श्री समर्थ जॉब कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा’ प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
रायगड, संदिप जाबडे
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत, गेल्या एका वर्षात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या ‘श्री समर्थ जॉब कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ या नामांकित संस्थेचा प्रथम वर्धापन दिन ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विनती ऑरगॅनिक्स कंपनीचे व्यवस्थापक महेश पुरोहीत, एच आर हेड कृष्णा पवार, श्री समर्थ जॉब कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सर्वेसर्वा व मुख्य संचालिका निशा मनोज पवार व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे महेश पुरोहित यांनी ‘श्री समर्थ जॉब कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने’ अल्पावधीतच उत्तम कार्य केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
संचालिका निशा मनोज पवार यांनी उपस्थितांचे आभार मानत सांगितले की, “महाड परिसरातील तरुणांना योग्य मार्गदर्शन आणि रोजगार मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. एका वर्षात आम्ही अनेक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून, भविष्यात आणखी व्यापक स्तरावर कार्य करण्याचा आमचा संकल्प आहे.”


