कुडपण खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह तसेच सरनाैबत काेंडाजी रायाजी शेलार (शेलारमामा) यांची ३५५ वी पुण्यतिथीचे आयाेजन

पोलादपूर, नितेश शेलार
थंड हवेचे ठिकाण म्हनुन पर्यटन साठी साठी प्रसिध्द असलेल्या पाेलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द येथे तपाेनिधी संत गणेशनाथ महाराज यांच्या प्रेरणेने व सदगुरु अरविंदनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे अखंड हरिनाम सप्ताह चे आयाेजन करण्यात येते त्याच अनुषंगाने दिनांक २७ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न हाेनार आहे .या मध्ये राेज काकडा आरती, पारायण, हरिपाठ, किर्तन, जागर, तसेच महिलांन साठी हळदी कुंकू तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आध्यात्मिक उपक्रम ग्रामस्थांनच्या वतीने राबविण्यात येनार आहेत. याचबराेबर स्वराज्याचे मामा सरनाैबत काेंडाजी रायाजी शेलार (शेलारमामा) यांची ३५५ वी पुण्यतिथी समाधी साेहळा जन्मगाव कुडपण खुर्द येथे साजरी हाेनार आहे समाधी साेहळा पुजा अभिषेक सदगुरु अरविंदनाथ महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात येनार आहे ह्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य कँबिनेट मंञी मा.श्री भरतशेठजी गाेगावले साहेब आमदार महाड पाेलादपूर, ( मंञी फलाेत्पादन/ राेजगार हमी याेजना/ खारभुमी विकास महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित राहनार आहेत तसेच कँबिनेट मंञी – अदिती ताई तटकरे (महिला आणि बालविकास) , आमदार – प्रविण भाऊ दरेकर ( अध्यक्ष मुंबई बँक) , महाडच्या माजी नगराअध्यक्षा स्नेहल माणिक जगताप, रा.जि.प सदस्य चंद्रकांत कळंबे, समाजसेवक- कृष्णा कदम, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वशंच शितलताई मालुसरे, अनेक ईतिहास तज्ञ, तसेच विविध राजकीय मंडळी, सामाजिक क्षेञातील मान्यवर पञकार, भाविक भक्त ,शिवभक्त ह्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये भेट देनार आसल्याचे हरिनाम सप्ताहाचे आयाेजक कुडपण खुर्द ग्रामस्थांनी सांगितले.



