गुड टच बॅड टच जनजागृती संभाजी ब्रिगेडचा स्तुत्य उपक्रम

राज्यात बलात्कार,लहान मुलांचे लैंगिक शोषण, अत्याचार तसेच निर्घृण हत्या आदी घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याच अनुषंगाने शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी प्राथमिक आदर्श शाळा(केंद्र) कोलाड, तालुका रोहा, जिल्हा रायगड या ठिकाणी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शन तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक धामणसे, रोहा तालुका संघटक आत्माराम दिवेकर यांच्या नियंत्रणाखाली संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा अंतर्गत रोहा तालुक्याच्या वतीने तसेच दामिनी पथक महाराष्ट्र पोलिस यांच्या विशेष सहकार्याच्या माध्यमातून गुड टच बॅड टच हा जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील जवळपास ४५० ते ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनीने यामध्ये सहभाग घेतला.
एकीकडे राज्यातील इतर राजकीय मंडळी,कार्यकर्ते निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असताना संभाजी ब्रिगेडमार्फत सध्याची काळाची गरज तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील जिल्हापरिषदेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेमध्ये गुड टच व बॅड टच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी दामिनी पथक महाराष्ट्र पोलिस हवालदार वैशाली कौजे मॅडम, शिपाई श्रावणी भोईर मॅडम, प्रसिद्ध रिल स्टार कोमल गायकवाड, साधना साटम,अक्षय गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शाळेचे मुख्याध्यापिका सीमा कळमकर प्रविण घाग, शुभांगी येरूणकर, जयेश महाडिक यांनी संभाजी ब्रिगेडने हाती घेतलेल्या या विशेष कार्यक्रमाचे आपल्या शाळेत आयोजन केल्याबद्दल शब्द सुमनाने तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


